shivajinagar court attack
sakal
पुणे - शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तरुणावर गोळीबार करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेले कोयते आणि दुचाकींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.