नारायणगावात दोन गटात वाद: पिस्तुलातून फायरिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

नारायणगावात दोन गटात वाद: पिस्तुलातून फायरिंग

नारायणगाव: येथील हॉटेल कपिल बियर बार मध्ये दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुल सारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पैकी दोन जणांना अटक केली आहे.ही घटना मंगळवारी (ता.१०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी एका गटातील मन्या पाटे , गणपत गाडेकर( राहणार नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथिदार व दुसऱ्या गटातील आकाश उर्फ बाबू कोळी ( राहणार घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे अज्ञात दोन साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या पैकी मन्या पाटे व आकाश कोळी यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.

मंगळवारी रात्री आरोपी हे येथील हॉटेल कपिल बियर बार

मध्ये दोन स्वतंत्र टेबलवर जेवण करण्यासाठी बसले होते.रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तात्कालिक कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.या वेळी मन्या पाटे गणपत गाडेकर व त्यांच्या इतर चार ते पाच साथिदारांनी धारदार चाकूने आकाश कोळी व त्याच्या साथीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर आकाश कोळी याच्या साथीदारांनी पिस्तुलातून मन्या पाटेच्या दिशेने पिस्तुलातुन एक राऊंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणी फौजदार सनिल धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपीवर गुन्हा दाखल केला. या पैकी दोन जणांना अटक केली.ही घटना पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नारायणगाव बसस्थानका जवळ भर चौकात असलेल्या हॉटेल कपिल बियर बारमध्ये घडली.विशेष म्हणजे घटनास्थळा पासून हाकेच्या अंतरावर नारायणगाव बसस्थानकात पोलीस मदत केंद्र आहे.

अल्पवयीन मुले गुन्हेगार प्रवृत्तीकडे : वर्षभरापूर्वी नारायणगाव येथील संग्राम घोडेकर याच्यावर कोयत्याने झालेल्या खूनी हल्ला प्रकरणात अल्पवयीन मुलाचा समावेश होता.त्या नंतर महिन्यापूर्वी मंचर जवळ झालेल्या खून प्रकरणात नारायणगाव येथून एक अल्पवयीन आरोपीला पिस्तुलासह अटक केली होती.कपिल बियर बारमध्ये झालेल्या खूनी हल्ल्यात अल्पवयीन मुलांनी पिस्तुलातुन फायरिंग केली. या घटनेवरून अल्पवयीन मुलांचा गुन्हेगार प्रवृत्तीकडे कल वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: Firing Pistol Two Groups Narayangaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top