Pandharpur Wari : करडे गावातून श्री भैरवनाथ-जोगेश्वरी पायी दिंडीचा पंढरपूरकडे भव्य प्रस्थान

करडे गावातून श्री भैरवनाथ-जोगेश्वरी पायी दिंडीचा पहिलाच सोहळा; हरिनाम, लेझिम, टाळ-मृदुंगाच्या गजरात पाचशे वैष्णवांसह पंढरपूरकडे प्रस्थान
Thousands of villagers gathered to witness the grand departure of the inaugural Karde Dindi during the Ashadhi Wari.

Thousands of villagers gathered to witness the grand departure of the inaugural Karde Dindi during the Ashadhi Wari.

Sakal

Updated on

शिरूर : महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन तर पुरूषांच्या खांद्यावर भगवी पताका... टाळ - मृदुंगाच्या गजराला लेझिमचा लयबद्ध नाद... मुखी हरिनामाचा गजर... ज्ञानोबा - तुकारामाच्या जयघोषासह नाथ साहेबांचं चांगभलं च्या गजराने आसमंत दुमदूमून गेलेला... संतांच्या पवित्र परंपरेचा वारसा जपत करडेकर ग्रामस्थांच्या श्री भैरवनाथ - जोगेश्वरी पायी दिंडी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. सुमारे पाचशे वैष्णवांच्या सहभागाने विठूरायाच्या चरणी भक्तीचे अर्पण घेऊन निघालेल्या या पहिल्याच सोहळ्याला निरोप देण्यासाठी अवघा गाव लोटला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com