अन् 172 वर्षांपुर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा

The first girls school was started 172 years ago in pune
The first girls school was started 172 years ago in pune
Updated on

पुणे : सजवलेले रथ, लेझीम आणि ढोल पथक यांसह फुले विचारांचे फलक घेऊन भव्य रॅलीत सहभागी झालेल्या फुले विचार समर्थकांनी केलेल्या जयघोषामुळे पुण्यनगरी दमदमून गेली. निमित्त होते  १ जानेवारीच्या ‘फुले दांपत्य सन्मान दिना’निमित्त  समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीर्फे आज काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे. 


 

अन् 172 वर्षांपुर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.  त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील ‘फुले दांपत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.

Happy New Year 2020 : पुण्यात बाराच्या ठोक्‍यावर फटाक्‍यांची आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत

भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडे आली. तिथून फुले वाड्यावर आलेल्या या रॅलीचे रूपांतर भव्य सभेत झाले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी गंजपेठ येथील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com