esakal | राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन आणि रानमांजर केंद्राचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

katraj

कात्रजमध्ये राज्यातील पहिले शेकरू प्रजनन आणि रानमांजर केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : पुणे महापालिकेच्या (pune corporation)हद्दीतील कात्रज (katraj) येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात (Rajiv Gandhi Zoological Park) उभारण्यात आलेल्या राज्यातील (maharashtra state) पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackrey) यांच्या हस्ते आज करण्यात आलं. राज ठाकरे (Raj thackrey) कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाला भेट देणार असल्याने त्यांच्या अनेक समर्थकांबरोबरच प्राणी प्रेमींनीही आज येथे हजेरी लावली होती. (first Shekru Breeding and Catting Center in state at Katraj)

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे. उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत.

हेही वाचा: डॉ. प्रमोद चौधरी वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार पदी

यावेळी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ,अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, मनसे नेते अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, वसंत मोरे, ऍड गणेश सातपुते, योगेश खैरे, रुपाली ठोंबरे पाटील, राजीव गांधी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.

loading image