
सकाळच्या वतीने आयोजित मराठी पॉडकास्ट निर्मात्यांचे पहिले शिखर संमेलन उत्साहात
पुणे : गेल्या काही काळात सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामध्ये क्रांती झाल्यामुळे संवादविषयक माध्यमं आणि त्यांच्या प्रकारांमध्येही मोठा बदल झाला आहे. माध्यमांचं जग हळूहळू अतिविशाल बनलं आहे.
नवी माध्यमं आपल्या आयुष्याचे सर्व आयाम व्यापून टाकत आहेत. माध्यमस्फोटाच्या काळात पॉडकास्ट्स हा म्हणजे संवादाचा अतिशय सरळ आणि परिणामकारक मार्ग आहे.
भारतात लाखो कथा आणि त्या सांगणारे ‘स्टोरीटेलर्स’ आहेत आणि आपल्या देशात लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात. काल्पनिक गोष्टी, लोककथा, लोकांचे जीवनानुभव आणि नुसत्या माहितीचंही कथन या पॉडकास्टमधून सांगितलं जातं. चांगल्या पॉडकास्ट्सला चांगले श्रोतेही मिळतात.
याचीच गरज ओळखून सकाळच्या वतीने आयोजित ‘मराठी पॉडकास्ट समिट’ शनिवारी (ता.७) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मराठी पॉडकास्ट शिकणाऱ्यांना आणि निर्मिती करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आयडिया ब्रिव्ह स्टुडिओचे कंटेंट हेड अनिरुद्ध पवाडे यांनी पॉडकास्ट लिहताना आपण काय काळजी घ्यायला हवी. आणि उत्तम पॉडकास्ट स्क्रिप्ट कसं असावं याविषयी सविस्तर माहिती दिली.
मराठी पॉडकास्ट समिटमध्ये आर. जे. संग्राम सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या सोबतच्या गप्पांमध्ये पॉडकास्टवरील मुलाखती उत्तमरित्या कशा साकारू शकतो, पॉडकास्टसाठीचा आवाज कसा असावा, पॉडकास्टवरील मुलाखती घेतना कोणती काळजी घ्यावी. याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
१.Time is currency श्रोत्यांच्या वेळेचा आदर करा.
२.एखादी मुलाखत घेत असाल तर त्या व्यक्ती विषयी संशोधन करा, त्यांच्या आधीच्या मुलाखती ऐका, पुस्तके लिहली असतील तर त्याची पुस्तके वाचा.
३. मजूकर महत्वाचा आहे -त्याचा सराव करा, त्यावर मंथन करा.
४. तुमचे श्रोते कोण आहेत, त्यांच मत ऐका ,त्यांचे प्रश्न समजून घ्या.
५. किमान वेळेत कमाल कसे बोलू शकाल याचा विचार करा
६.पॉडकास्ट असे माध्यम आहे की, ज्याला चौकट नाही. कोणत्याही नियमांचे बंधन नाही. त्यामुळे ती चौकट तुम्ही पार करु शकता का, त्या चौकटी बाहेरच्या विषयांवर बोलू शकता का याचा विचार करा.
७. अप टू डेट रहा.