Corona Patients
Corona PatientsSakal

नऊ महिन्यानंतर पुणे शहरातील रुग्ण पहिल्यांदाच झाले इतके कमी

रुग्णांलयात उपचार घेत असलेल्या पुणे शहरातील दुसऱ्या लाटेतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता. २६) पहिल्यांदाच एक हजारांच्या आत आली आहे.
Published on

पुणे - रुग्णांलयात (Hospital) उपचार घेत असलेल्या पुणे शहरातील दुसऱ्या लाटेतील एकूण कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या सोमवारी (ता. २६) पहिल्यांदाच एक हजारांच्या आत आली आहे. सध्या शहरातील केवळ ९१६ कोरोना रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार (Treatment) सुरु आहेत. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे नऊ महिन्यांच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच इतकी कमी झाली आहे. याआधी ३ नोव्हेंबर २०२० ला शहरातील शहरातील ८८० रुग्ण उपचार घेत होते. (First Time in Nine Months Number of Patients City of Pune Low)

याशिवाय पुणे शहरातील एकूण सक्रिय (ॲक्विटव्ह) कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारांच्या आसपास आली आहे. दुसऱ्या लाटेत हीच संख्या ५४ हजारांवर गेली होती. सद्यःस्थितीत पुणे शहरात एकूण २ हजार ६४२ सक्रिय कोरोना रुग्ण असून, यापैकी १ हजार ७२६ जण गृहविलगीकरणात आहेत. उर्वरित ९१६ जण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.

Corona Patients
पुणे : कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोससाठी मंगळवारी ६० टक्के लस

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात पुणे व पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि कटक मंडळांच्या हद्दीतील रोजचे नवीन कोरोना रुग्ण, बरे झालेले रुग्ण, रुग्णालयांत उपचार घेत असलेले , गृहविलगीकरणातील रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची क्षेत्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून डिसेंबर २०२० पर्यंत शहरात कोरोनाची पहिली लाट सुरू होती. जानेवारी आणि फेब्रुवारीतील पहिले दोन आठवडे, अशा एकूण सहा आठवड्यांच्या खंडानंतर शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली होती. ही दुसरी लाट ओसरण्यास १ जून २०२१ पासून सुरवात झाली होती.

Corona Patients
पॅरोलवर असतानाच आरोपीने रचला आखाडे यांच्या खुनाचा कट

शहरातील कोरोना स्थितीत दृष्टीक्षेपात...

- शहराची लोकसंख्या --- सुमारे ४५ लाख

- आतापर्यंतच्या एकूण कोरोना चाचण्या --- २८ लाख ४४ हजार २८०

- आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित --- ४ लाख ८५ हजार ८५५

- एकूण कोरोनामुक्त --- ४ लाख ७४ हजार ४७७

- आतापर्यंतचे एकूण मृत्यू --- ८ हजार ७३६

- सध्याचे सक्रिय कोरोना रुग्ण --- २ हजार ६४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com