पुणे : पाच ब्रास वाळू लपवली तेही पहिल्या पंचनाम्यातच...

Shikrapur
Shikrapur
Updated on

शिक्रापूर : वाळू लपवून क्रशसॅंड दाखविण्याच्या शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील प्रकाराने आता खुद्द महसूल विभागालाच धक्का दिला असून, महसूलच्या पहिल्या पंचनाम्यापेक्षा आजच्या पंचनाम्यात तब्बल पाच ब्रास वाळू लपविल्याचे निषन्न झाले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील महसूल व पोलिस यंत्रणेच्या लागेबांध्याचा अंदाज आल्याने प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी आजचा पंचनामा चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविला आणि पाच ब्रासचा घोटाळा आज अधिकृतपणे पुढे आला. 

बेकायदा वाळू वाहतूक करताना पकडलेल्या व शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये लावलेल्या एका ट्रमधील वाळूला क्रशसॅंड दाखविण्याच्या फसवेगिरीचा आणखी एक पर्दाफाश आजच्या पुनर्पंचनामाच्या प्रसंगी झाला. 22 तारखेला केलेल्या पंचनाम्यात ज्या ट्रकमध्ये साडेतीन ब्रास वाळू दाखविली गेली होती, ती आज चक्क सव्वाआठ ब्रास निष्पन्न झाली असून, ही मोजणी कोणी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली नाही तर हा पंचनामा केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्य अधिकाऱ्यांनी. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात चोरीची वाळू वाहतूक म्हणून गाडी पोलिसांनी पकडून सदर गाडीचालकावर चोरीचा गुन्हा का दाखल नाही केला, याचे गौडबंगाल आता अधिक वाढले आहे. 

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या आवारात जप्त केलेला हायवा ट्रक (एमएच-१४-एचजी-७२९१) यातील वाळूऐवजी क्रशसॅंड दाखविण्याचा गंभीर प्रकार पोलिस स्टेशनच्या आवारात पोलिसांच्या समोरच २७ रोजी झाला. याबाबत 'सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी काल पुनर्पंचनाम्याचे आदेश देताच आज पंचनाम्यासाठी महसूलचे नाही तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी एस.डी.मुरकुटे उपस्थित झाले. दरम्यान, संपूर्ण गाडीभर वाळूचेवर क्रशसॅंडचा एक थर अंथरुन वाळू लपविण्याचा प्रयत्न या पंचनाम्यात आढळला व एकूण वाळू ८.२० ब्रास एवढी म्हणजेच पूर्वीच्या पंचनाम्यापेक्षा तब्बल पाच ब्रास जास्त आढळली. यावेळी महसूल विभागाचे वतीने तलाठी अविनाश जाधव उपस्थित होते तर पोलिस स्टेशन हद्दीतच पंचनामा सुरू असताना एकाही पोलिसाचे पंचनाम्यावेळी थांबण्याचे धाडस झाले नाही हे विशेष.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तब्बल पाच ब्रास वाळू कमी दाखविल्याप्रकरणी आता प्रांताधिकारी देशमुख कोणावर कारवाई करणार याची उत्सुकता आहे.  

हे प्रकरण पोलिसांनी घडवून आणल्याचा महसूलचा दावा

बेकायदा-चोरीची वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला तो का म्हणून? असे ट्रक पकडण्याचा त्यांना अधिकार आहे तर मग ते गुन्हा का दाखल करीत नाहीत? आमच्या ताब्यात देताना पोलिस स्टेशनमध्ये उभ्या ट्रकमधील वाळूवर सॅंड कुणी टाकली याची चौकशी शिक्रापूर पोलिस का करीत नाहीत? या उलट आमच्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही तक्रार दाखल करा मग आम्ही गुन्हे दाखल करतो, असे शिक्रापूर पोलिस खाजगीत दबाव का आणत आहेत? हे सर्व प्रश्न तलाठी जाधव तसेच शिरुरमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना उपस्थित केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com