

आंबेठाण : एमआयडीसीच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत व्हावी यासाठी नूतनीकरण करण्यात आलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता ( ता.खेड ) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या मार्गावरील आंबेठाण ते वराळे या दरम्यान मागील दहा दिवसांत पाच मृत्यू झाले आहे. यात कामगार वर्गाचे प्रमाण जास्त आहे.