

Pune Municipal School
esakal
पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांवर दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात असताना आता महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण करण्याचा धक्कादायक प्रस्ताव समोर आला आहे. आकांक्षा फाउंडेशन ही संस्था सीएसआरमधून महापालिकेच्या पाच शाळा चालवत होती. मात्र, आता या संस्थेला सीएसआरमधून निधी मिळत नसल्याने महापालिकाच थेट २५ हजार रुपये प्रति विद्यार्थी इतके पैसे देणार आहे. यातून पुढील नऊ वर्षांत तब्बल १०१ कोटी रुपये मोजणार आहे. महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाचा घाट घातलेल्या या प्रस्तावावर उद्या (ता. ११) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.