esakal | डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

नातेवाईक महिलेचे पूर्ण बिल मागितले म्हणून येथील एका खासगी कोविड सेंटरमधील डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वैद्यकीय सेवा संस्था कायद्यान्वये तसेच शिवीगाळ, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, डॉक्‍टरांच्या संरक्षणार्थ केलेल्या कायद्याचा शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये प्रथमच वापर करण्यात आला असून तीन आरोपींना तत्काळ अटक केल्याची माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली. 

डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल 

sakal_logo
By
भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : नातेवाईक महिलेचे पूर्ण बिल मागितले म्हणून येथील एका खासगी कोविड सेंटरमधील डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वैद्यकीय सेवा संस्था कायद्यान्वये तसेच शिवीगाळ, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, डॉक्‍टरांच्या संरक्षणार्थ केलेल्या कायद्याचा शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये प्रथमच वापर करण्यात आला असून तीन आरोपींना तत्काळ अटक केल्याची माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका चंद्रकांत थोरात (वय 56, रा. शिक्रापूर) यांनी 14 दिवस तर त्यांची मुलगी नीता अनिल गायकवाड (वय 35) या दोघी येथील माऊलीनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बऱ्या झाल्या. दोघींचेही बिल थकविले म्हणून हॉस्पिटलचे डॉक्‍टर डॉ. अजिंक्‍य तापकीर यांनी त्यांना बिल मागितले. तसेच पूर्ण बिल भरले नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज कार्ड व काही बिले दिली. फक्त पूर्ण बिल दिल्यावर मेडिक्‍लेमसाठी आवश्‍यक बिले देवू असे ते म्हणाले. दरम्यान, त्या दोघींचे नातेवाईक असलेले नीलेश थोरात व रमेश थोरात यांनी यांनी डॉक्‍टरांना वारंवार दमदाटी केली.

संजीव धुरंधर यांचा सन्मान; अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड

त्यानंतर मंगळवारी (ता. 29) रमेश थोरात, गोविंद गायकवाड व इतर दोघांनी डॉ. तापकीर यांना धक्काबुक्की जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तापकीर यांनी फिर्याद दिली. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेची दखल घेऊन रमेश थोरात, स्वप्नील वाघोल व रोहित गायकवाड या तिघांना तत्काळ अटक केल्याची माहिती तपास अधिकारी जगताप यांनी दिली. 

loading image