esakal | पाच रुपयांत मनपा पीएमपीएलची बस सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीएलची बस सेवा

पाच रुपयांत मनपा पीएमपीएलची बस सेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : सहकारनगर नागरीक मंच तर्फ वार्ड सभा आयोजित केली होती यामध्ये सहकारनगर भागातील नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत समस्या मांडल्या.यामध्ये  प्रामुख्याने सहकारनगर भागातील ज्येष्ठ नागरिकांची बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. वार्ड सभेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ बस सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता सहकारनगर ते स्वारगेट या पाच रुपयांत बस सेवेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सहकारनगर येथे करण्यात आले.

हेही वाचा: सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करा- खा. सुप्रिया सुळे

यावेळी नगरसेवक महेश वाबळे,पीएलपीएल चे व्यवस्थापक दत्तात्रय धेंडे ,इंद्रनील सदगरे, इंद्रजित चिखलीकर,अमित अभ्यंकर,प्रसन्नजीत फडवणीस,नितीन करंदीकर,प्रशांत थोपटे, हरीश परदेशी,विजय बिबवे,अमोल गडकरी इ. उपस्थित होते.यावेळी प्रवाशांच्या सोबत नगसेवक महेश वाबळे यांनी सहकारनगर ते स्वारगेट बसमध्ये प्रवास केला.यावेळी किर्तीभाई संघराजका ( वय.७२ .रा.सहकारनगर) म्हणाले, सर्व राजकीय लोकांनी मिळून बस सेवा सुरू केली.लोकशाही मार्गातून केलेल्या मागणीचे हे उत्तम उदाहरण दिले.नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात मात्र नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.मनोहर साठे(वय७३ रा.सावरकर सोसायटी)

हेही वाचा: साधना सहकारी बँकेच्या इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

पाच रुपयेमध्ये  सहकारनगर ते स्वारगेट बस सेवा सुरू केली याचा फायदा सहकारनगर मधील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.स्वारगेट वरून कोठे ही बसने पुढे जात येते.त्याच बरोबर सहकारनगर ते पुणे स्टेशन ,शिवाजी नगर अशी अटळ बस सुरू करण्यात यावी. यावेळी प्रशांत थोपटे म्हणाले, सहकारनगर भागातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी पाच रुपयांत बस सेवा करण्याची गरज होती मनपा प्रशासनाने आज अखेर सहकारनगर ते स्वारगेट सेवा केल्याबद्दल पीएमपीएलचे आभार .

loading image
go to top