#PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर 

five thousand people shifted
five thousand people shifted

पुणे - पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. विविध भागांतील महापालिकेच्या १५ शाळांत त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पूर ओसरेपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंवडणा, विश्रांतवाडी, औंध, बाणेर आदी भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, ‘गरजेनुसार ज्या भागांत नदीचे पाणी शिरण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणाच्या लोकांना तातडीने हलविण्यात येईल. त्यासाठी ३९ शाळांत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत,’ असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. ५) सांगितले. 

सलग पाऊस होत असल्याने खडकवासला धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढल्याने काही भागांतील घरांत पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह, अग्निशामक दल आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पाणी शिरलेल्या घरांमधील ६३७ जणांना दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. या सर्व लोकांची ज्या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे, जेवणासह आरोग्य आणि आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला ब्लॅंकेट, महिला आणि लहान मुलांसाठी आवश्‍यक त्या वस्तू देण्यात आल्या आहेत. 

महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने काही लोक स्वत:हून सुरक्षित ठिकाणी पोचले आहेत. पूरस्थिती आहे, तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. स्थलांतरित लोकांची संख्या वाढली तरी, त्या प्रमाणात यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्युपिटर रुग्णालयांतील १५ रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविले आहे. गेल्या तीन दिवसांत १० ठिकाणी भिंती पडल्या आहेत. ५४ झाड पडण्याच्या घटना घडल्या असून, १७ प्राण्यांना वाचविले आहे. सध्या ‘एनडीआरएफ’चे १७ जवान  कार्यरत आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com