
खडकवासला - खडकवासला धरणातून यंदा १९ जून पासून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सलग २१ दिवस मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजअखेर सुमारे पाच टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
खडकवासला धरणात पाच टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. असे असले तरी, या धरणात आज अखेर १.११ टीएमसी म्हणजे ५६.२२ टक्के पाणीसाठा जमा आहे. धरणातून सोडलेले पाणी फक्त खडकवासला धरणात जमा झालेले पाणी आहे.