Third round of five-year law admissions begins Thursday.
sakal
पुणे : पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेसाठी गुरुवार (ता. ३) ते शनिवार (ता.५) दरम्यानचा कालावधी देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्ज भरणे अनिवार्य आहे, असे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सांगितले आहे.