esakal | मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्यास सक्तमजुरी 
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्यास सक्तमजुरी 

ओळखीच्या नऊ वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली.

मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्यास सक्तमजुरी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ओळखीच्या नऊ वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली.

नवनाथ तुळशीदास पवार (रा. महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. ही घटना एक एप्रिल २०१४ रोजी घडली होती. या प्रकरणात सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी आठ साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दीपाली मोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

loading image
go to top