
केडगाव : आषाढीवारी जवळ आल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे सोलापूर महामार्गावरून संत तुकाराम महाराज, संत चांगा वटेश्वर, चौरंगीनाथ महाराज आदी पालखी सोहळे पंढरपूरकडे जात असतात.