सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी झेंड्याचे ध्वजारोहण

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

खडकवासला - सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या झेंड्याचे ध्वजारोहण बुधवारी करण्यात आले. जमिनीवरील 760 मीटर उंचीवरील ध्वजाचे सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला येथील मंडल अधिकारी आर. एच. जाधव यांच्या हस्ते झाले. 

खडकवासला - सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या झेंड्याचे ध्वजारोहण बुधवारी करण्यात आले. जमिनीवरील 760 मीटर उंचीवरील ध्वजाचे सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला येथील मंडल अधिकारी आर. एच. जाधव यांच्या हस्ते झाले. 

सिंहगडाची जमिनीवरील उंची 760 मीटर आहे. तर समुद्र सपाटीपासून 1312 फूट उंची आहे. गडावरील बालेकिल्ल्यावर श्रीकोंढणेश्वर मंदिराजवळ हा ध्वजस्तंभ आहे. येथे फडकविलेल्या झेंड्याचा आकार 21 बाय 14 फूट आहे. यावेळी घेरा सिंहगडचे तलाठी मिलींद शेटे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर, वनपाल हेमंत मोरे, वनपाल बाळासाहेब जीवडे, माऊली कोडीतकर, सुरक्षारक्षक नितीन गोळे, नितीन पायगुडे, रोहित बोरकर,  विठ्ठल पढेर, अभिजित शहाडे, सागर चव्हाण, प्रफुल्ल भिलारे, उत्तम खामकर, नंदू जोरकर, शांताराम लांघे बाजीराव जाधव, राम शेलार, मिलिंद गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, बाजीराव जाधव यावेळी उपस्थित होते. 

गडावर २६ जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी येथे शासकीय ध्वजारोहण होते. जिल्ह्यातील एवढ्या उंचीवरील हा सर्वात मोठा ध्वज आहे असा दावा पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag hoisting on Sinhagad of Independence Day