
पुणे : पाच महिन्यांची गरोदर असलेली ‘ती’ वारजेतील महापालिकेच्या पृथक बराटे दवाखान्यात आली, तपासणी झाली, पण ती तिथून हलायला तयारच नव्हती... कारण तिच्या आयुष्यातला तो दवाखाना होता छळापासून सुटण्याचा एक छोटासा आशेचा किनारा. पती दारू पिऊन मारहाण करत असल्याचे सांगत ‘मी परत घरी जाणार नाही, मला इथेच राहू द्या, मी सगळे काम करेल असे म्हणाली. तिचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ही बाब निराधार महिलांसाठी काम करणाऱ्या ‘माहेर’ संस्थेला कळवली असता त्यांनी तिला आसरा दिला व आता स्मिता तेथे आनंदात राहून तिची व पोटातील बाळाची काळजी घेत आहे.