

Plane Departure
पुणे - पुणे विमानतळावरून सरत्या वर्षात तब्बल ७० हजार ९९२ विमानांचे उड्डाण झाले असून, यातून एक कोटी आठ लाख प्रवाशांची वाहतूक झाली आहे. मागील वर्षीच्या (२०२४) तुलनेत प्रवासी संख्या आणि विमानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मागील वर्षाच्या तुलनेत तीन हजार ५०८ विमानांची अधिक उड्डाणे झाली, तर सहा लाख २८ हजार १२७ प्रवासी संख्या वाढली आहे.