पुणे : विमानाचा टायर फुटला; लोहगाव विमानतळावरील सेवा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flight tyre bursts on runway Lohagaon airport

पुणे : विमानाचा टायर फुटला; लोहगाव विमानतळावरील सेवा विस्कळीत

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोहगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समजते आहे. या घटनेत धावपट्टी देखील खराब झाली असून विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Flight tyre bursts on runway Lohagaon airport in Pune)

विमानासंदर्भात घडलेल्या या घटनेमुळे इतर विमानांच्या उड्डाणावर याचा मोठा परिणामही झालाय. अनेक प्रवाशांना या घटनेमुळे गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे. ज्या विमानाचा टायर फुटला आहे त्यासंदर्भात अद्याप अधिक माहिती समजू शकलेली नाही. पण विमानतळावरील सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि अन्य विमानांच्या उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

Web Title: Flight Tyre Bursts On Runway Lohagaon Airport In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newspune airport
go to top