महाळुंगे पडवळ - कळंब, साकोरे, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक, लौकी आदी गावात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस होत आहे. कळंब येथे तीन दिवसांत ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चास परिसरात बुधवारी (ता.२२) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ओढ्यांना पूर आला. चास-घोडेगाव रस्त्यावरील पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.