
कृष्णकांत कोबल
हडपसर : गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गाडीतळ येथील बंटर शाळेच्या आवारातील टपाल कार्यालयाभोवती प्रत्येकवेळी पाण्याचा विळखा पडत आहे. याठिकाणी विविध कामानिमित्त येणाऱ्या शेकडो नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही येथून कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.