
बालेवाडी : बाणेर-बालेवाडी परिसरात बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. बाणेर येथील अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये, प्रवेशद्वारासमोर, तसेच काही घरांतही पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.