Zendu Flower
Zendu FlowerSakal

फुलांचे बाजारभाव वाढले; दसऱ्याला बाजार भाव कडाडणार

'स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून १०० रुपये किलो इतका शेताच्या बांधावर झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे.
Summary

'स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून १०० रुपये किलो इतका शेताच्या बांधावर झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे.

मंचर - 'स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून १०० रुपये किलो इतका शेताच्या बांधावर झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे. गेली दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी फुलशेती कोलमडली आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे. दसर्यापर्यंत बाजारभाव अजून कडाडतील.' असे मंचर येथील फुल विक्रेत्यांनी सांगितले.

आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झेंडू,अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती आदी फुलांचे भरघोस उत्पादन घेतात. पण यावर्षी अनेक गावात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली. परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही.' असे तांबडेमळा येथील फुल उत्पादक शेतकरी महादू तांबडे व बाजीराव तांबडे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'भोसरी, पुणे, मंचर येथील व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावरून १०० रुपये बाजारभावाने झेंडू (कलकत्ता जातीचा) फुलांची खरेदी सोमवारी (ता. ३) केली आहे. कलकत्ता जातीची फुले चार दिवस टिकतात. त्यामुळे त्यांची मागणी जास्त आहे.

'आंबेगाव तालुक्यात फुलांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तांबडेमळ्यातून दररोज तीन टनापेक्षा अधिक झेंडूच्या फुलांची खरेदी पुणे, मुंबई,मंचर, नारायणगाव, लोणावळा भागातील व्यापारी वर्गाकडून केली जाते.' असे शेतकरी निशानंद भोर व सुनील भोर यांनी सांगितले.

'पितृ पधरवाड्यात झेंडूचे प्रती किलो बाजारभाव ३० ते ४० रुपये होते.नवरात्रीत ५० ते ६० रुपये बाजारभाव होते. सोमवारी (ता.३) १५० रुपये बाजारभावाने झेंडूची विक्री केली आहे. सर्वच फुलांचे बाजारभाव वाढल्याने ग्राहकही मोठ्या हाराएवजी लहान आकाराच्या हाराला पसंती देत आहेत.सद्यस्थितीत फुलांचे बाजारभाव चढे राहतील.' असे मंचर येथील फुल विक्रेते रतन निघोट यांनी सांगितले.

मंचर बाजारातील फुल विक्री दर

झेंडू - १४० रुपये किलो

पांढरी शेवंती - २०० ते २२५ रुपये किलो.

गुलछडी / रजनीगंधा - ३०० रुपये किलो

गुलाब - प्रती २० रुपये

अस्टर - २०० रुपये शेकडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com