फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॅलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करताना माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, मिलिंद आहिरे

फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

कॅन्टोन्मेंट - महामानव, बोधिसत्व, प. पु. विश्वरत्न, भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने पुणे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलेक्टर ऑफिस व अरोरा टॉवर कॅम्प जवळील पुतळ्यावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर,अविनाश साळवे, साहिल केदारी, व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद दत्ता अहिरे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात अली.

गेल्या ७ते ८ वर्षा पासून फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्याचे प्रथम नागरिक (महापौर) व कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येत असते. परंतु या वेळेस दोन्ही ठिकाणी प्रशासक नेमल्यामुळे वरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षापासून अरोरा टॉवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती मंडप व विद्युत रोषनाई केली जाते. मागील २ वर्षी कोरोना मुळे जयंती साजरी करण्यात आली नाही, परंतु या वर्षी प्रचंड उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरा करण्यात आली तसेच अरोरा टॉवर चौकात मिरवणुकीने आलेल्या सर्व मंडळांचे व त्याच्या अध्यक्षांना फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने मिलिंद अहिरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानाचे रोहन अहिरे, निनाद अहिरे, विनील रणपिसे,रोहन साळवे, आशिष पवार,शरद मोरे, व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Flower Shower On Statue Of Babasaheb Phule Ambedkar Public Service Foundation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top