Pune Delhi Plane Journey
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - प्रवाशांचा पुणे-दिल्ली विमान प्रवास आता आरामदायक होणार असून, या प्रवासात ‘बिझनेस क्लास’ची (स्ट्रेच क्लास) सुविधा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील एका विमान कंपनीने पुण्यातून बिझनेस क्लासची सुविधा सुरू केली होती. आता पुन्हा नव्याने सुरू झाली असून, याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याचे तिकीट दर प्रतिप्रवासी २५ हजारांपासून आहेत.