
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी म्हणून विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर आज (ता. २) दुसऱ्याच दिवशी या उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वडगाव सिग्नल पुलापासून ते उड्डाणपुलावर जवळपास एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणपूल अवघ्या तीन ते चार मिनिटात पार करणे आवश्यक असताना वाहतूक कोंडीमुळे सुमारे अर्धातास लागत होता. त्यामुळे उड्डाणपूल खुला होताच वडगाव सिग्नल व परिसरात वाहतूक सुधारणा करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.