

पुणे - प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट मुळा-मुठा नदीमध्ये सोडल्याने प्रदूषित होणारी नदी, प्रचंड वृक्षतोड, वाहतूक कोंडी, वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारे हवेचे प्रदूषण, कचरा जाळण्याचे प्रकार, वाढणारे बांधकाम क्षेत्र, आरएमसी व स्टोन क्रशर प्लांटमुळे हवेची दिवसेंदिवस ढासळणारी गुणवत्ता, तसेच वाढते ध्वनी प्रदूषण, या पद्धतीने पुणे शहराला जल, वायू व ध्वनी प्रदूषणाने अक्षरशः ग्रासले आहे.