CM Devendra Fadnavis : शिवरायांच्या विचारांनी मी काम न केल्यास माझा कडेलोट करा

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या प्रांगणात जन्ममहोत्सवाचे आयोजन केले होते.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी जर मी काम केले नाही तर माझा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या प्रांगणात जन्ममहोत्सवाचे आयोजन केले होते. तेथील कार्यक्रमास फडणवीस यांनी हजेरी लावून, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी फडणवीस यांनी त्यांची भावना व्यक्त केली.

त्यावर अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर म्हणाले, किल्ले रायगडच्या आशीर्वादाने फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस यांनी रायगड आराखड्याला पहिल्याच बैठकीत मध्ये मान्यता दिली आहे.

हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिव विचारांनीच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील असा विश्वास शिवप्रेमींमध्ये आहे, असेही पासलकर यांनी नमूद केले. गेल्या दोन दशकांपासून अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात. छत्रपती शिवरायांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच शिवमहोत्सव साजरा केला जातो असे पासलकर यांनी सांगितले.

प्रभाकर देशमुख म्हणाले, शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी व शिवतीर्थ किल्ले रायगड याच्या विकासासाठी कार्य करता आले ही आयुष्यात खूप मोठे कार्य करता आले याचे समाधान असेल.

यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, संजीव नाईक निंबाळकर, रायगड विकास प्राधिकरणाचे मार्गदर्शक प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या साधना पासलकर, सोनाली धुमाळ, मीना बराटे, पूजा झोळे, स्नेहल पायगुडे यांनी पालखीला खांदा दिला. प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर विराज तावरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास वडघुले, मंदार बहिरट, नीलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सतीश शेलार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com