
गौतमबुद्धांची विचारसरणी आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त या विचारसरणीचे मर्म विशद करणारे विवेचन. भारताला ज्ञानाची, संस्कारांची, युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रांपैकी एक शास्त्र बौद्धदर्शन होय. राजपुत्र म्हणून जन्माला आलेले आणि गयेला बोधीवृक्षाखाली परमशांतीचा अनुभव घेतलेले गौतमबुद्ध हे दर्शनशास्त्राचे प्रणेते आहेत.