

PNE26W42986 सोलापूर ः सीईओ कुशल जैन यांच्या हस्ते ५० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.
क्षयरुग्णांना औषधांसोबत पोषणाचीही गरज
सीईओ कुशल जैन; फिनिक्स केअर फाउंडेशनकडून ५० क्षयरुग्णांना फूड बास्केट
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : क्षयरोगावरील उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित न ठेवता रुग्णांना सकस आणि पौष्टिक आहाराचीही साथ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले. उपचाराधीन क्षयरुग्णांना पोषणाची मदत मिळावी, यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि उद्योजकांनी पुढे येऊन रुग्णांना दत्तक घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘फिनिक्स केअर फाउंडेशन’च्या सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील उपचाराधीन ५० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहाराच्या फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. या फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील ५० उपचाराधीन रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावेळी फाउंडेशनच्या तनुजा शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद अभिवंत, विजय शेगर, राजकिरण भुताळे, युसूफ चौधरी, नागराज येळसंगी आदी उपस्थित होते.
‘रुग्णांना दत्तक घ्या’
क्षयरुग्णांच्या उपचार काळात पौष्टिक आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योजक तसेच विविध संस्थांनी पुढाकार घेऊन उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे आणि फूड बास्केटच्या माध्यमातून त्यांच्या पोषणाची जबाबदारी घ्यावी, असे जैन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.