

मंचर, ता. ६ : आंबेगाव तालुक्यातील घाऊक व किरकोळ किराणा व्यापाऱ्यांसाठी अन्नसुरक्षा व मानके विभागाच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्राबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. ७) दुपारी १.३० वाजता एकलहरे (ता. आंबेगाव) येथील हॉटेल रविकिरण सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा ग्राहक उत्पादन वितरक संघटनेचे संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिली.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या प्रशिक्षणामध्ये अन्नसुरक्षाविषयक नियम, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्याची आवश्यकता तसेच प्रमाणपत्र मिळविण्याची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अभिजित झोडगे आणि अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक संतोष चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्हा ग्राहक उत्पादन वितरक संघटना, आंबेगाव तालुका किराणा भुसार असोसिएशन, घोडेगाव किराणा भुसार असोसिएशन आणि मंचर शहर किराणा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व किराणा व्यापाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहून अन्नसुरक्षा नियम व प्रमाणपत्राबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन आंबेगाव तालुका किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ खुडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.