FMD Viral Diseases
sakal
पुणे - राज्यातील पशुधनाचे लाळ्याखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत १३ ऑगस्टपासून राज्यभर लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.