सुब्रतो मुखर्जी फुटबॉल जोड

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल जोड
Published on

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल जोड

हडपसरच्या अमनोरा स्कूलने हडपसरच्या जयवंत पब्लिक स्कूलवर टायब्रेकअखेर ५-३ अशा गोलने मात केली. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी सुरेख खेळ केला. खेळाच्या आठव्या मिनीटास अमनोरा स्कूलच्या पुरव बजाजने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली, परंतु या आघाडीचा आनंद त्यांना फार काळ टिकविता आला नाही. खेळाच्या सतराव्या मिनिटास जयवंत पब्लिक स्कूलच्या अथर्व वाघमारेने गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. परंतु गोल होऊ शकला नाही. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये अमनोरा स्कूलच्या निलय कारंडे, आरुष गुप्ता ,अथर्व विश्वकर्मा व सक्षम वत्सने गोल केले, तर जयवंत पब्लिक स्कूलकडून आर्यन बाम व अथर्व माळवे हे दोघेच गोल करू शकले.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com