
हडपसर : महापालिकेचा अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांकडून अंतर्गत रस्त्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात जावून अतिक्रमण कारवाई केली जात आहे. मात्र, त्याचवेळी सायकल ट्रॅक व पादचारी मार्ग ओलांडून थेट मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून अवतरत असलेल्या येथील कार बाजाराकडे गंभीर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह मुख्य रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा होवून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.