पारगाव - यंदाचा आखाड मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणी ठरला आहे. नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुक उमेदवारांच्याकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळी पर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन केले जात असुन खवय्यांना खुश करण्यासाठी मटण, चिकन तसेच माश्यांची मेजवानी ठेवण्यात येत आहे त्यामुळे यंदाचा आखाड मांसाहारी खवय्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.