
मांजरी येथे वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई
मांजरी: येथील मांजराई नगर परिसरातील ७२ घरकुल वस्तीलगतच्या ओढ्याजवळील वनविभागाच्या जागेवर झालेल्याअतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पालिकेच्या अतिक्रमण तसेच वन विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. सुमारे तीस झोपड्यांवर ही कारवाई करण्यात आली.या झोपड्या उभारण्यासाठी काही स्थानिक कार्यकर्त्यांना पैसे दिले होते. झोपड्या आम्ही पाडू देणार नाही, असे अश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले होते. पालिकेकडून अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटीस दिली होती, तरीही संबंधीत कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात सांगितले होते. मात्र, आज आमचे संसार उघडे पडले आहेत. यापूर्वीही येथे सुमारे दीड हजार झोपड्या झालेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई नाही, अशी तक्रार या झोपडीधारकांनी केली आहे.
दरम्यान, झालेल्या कारवाईमुळे या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. भांडी, इतर गरजेच्या वस्तू, अन्नधान्य मातीमोल झाले आहे. या सर्वांना उघड्यावर राहवे लागले. पै पै करून उभारलेला संसार असा मातीत मिसळल्याने आता तो कसा सावरावा, असा गंभीर प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
Web Title: Forest Department Land Manjari Encroachment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..