भोरच्या माजी नगरसेवकास तीन महिन्याच्या कैदेची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Court
भोरच्या माजी नगरसेवकास तीन महिन्याच्या कैदेची शिक्षा

भोरच्या माजी नगरसेवकास तीन महिन्याच्या कैदेची शिक्षा

भोर - ६ लाख ५८ हजार रुपयांच्या धनादेशाचा अनादर (चेक बाऊंस) केल्याप्रकरणी नगरपरिषेचे माजी नगरसेवक सतीश किसन शेटे यांना भोरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. येथील मे. कोळसकर अॅन्ड सन्स (ज्वेलर्स) चे मालक चंदन रवींद्र कोळसकर यांनी याबाबत भोरच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. सतीश शेटे यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये चंदन कोळसकर यांच्या दुकानातून १० लाख ५८ हजारांचे दागीने खरेदी केले. त्यावेळी ४ लाख रुपये दिले आणि ६ लाख ५८ हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु धनादेश बँकेतून परत आला. त्यामुळे चंदन कोळसकर यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये भोरच्या न्यायालयात सतीश शेटे याच्याविरोधात चेक बाऊंसची कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली. न्यायालयाने सुनावणी घेवून चार वर्षानंतर डिसेंबर २०२१ मध्ये या केसचा निकाल दिला. त्यामध्ये सतीश शेटे यांना ४ महिन्यांची कैद आणि ७ लाख रुपये देण्याची शिक्षा सुनावली.

७ लाखांपैकी ६ लाख ८० हजार रुपये फिर्यादी चंदन कोळसकर यांना देण्यात यावे आणि २० हजार रुपये न्यायालयीन प्रक्रीयेच्या खर्चासाठी जमा करण्याचे आदेश दिले. भोरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती यू. यू. पाटील यांनी वरील आदेश दिले. फिर्यादीतर्फे अॅड दिगंबर खोपडे यांनी काम पाहिले.

Web Title: Former Bhor Corporator Sentenced To Three Months In Jail Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimebhor
go to top