Ganesh Bidkar News : "लई मस्ती आली का? चुपचाप २५ लाख रुपये दे"; भाजप नेते बिडकरांना फोनवरून धमकी | Pune Crime News | Former BJP corporator Ganesh Bidkar threatened | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh bidkar

Ganesh Bidkar News : "लई मस्ती आली का? चुपचाप २५ लाख रुपये दे"; भाजप नेते बिडकरांना फोनवरून धमकी

पुणे : भाजप चे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर यांना शिवीगाळ करत अनोळखी नंबर वरुन धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश बिडकर यांनी या प्रकरणी स्याबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमी उत्सव सुरू असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. "लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी खंडणी देखील मागितली.

पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू असे देखील या अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे.

टॅग्स :Pune News