पुणे :..म्हणून भाजपच्या माजी आमदाराने ठोकले सरकारी कार्यालयाला टाळे (व्हिडिओ)

पुणे :..म्हणून भाजपच्या माजी आमदाराने ठोकले सरकारी कार्यालयाला टाळे (व्हिडिओ)

मांजरी : हडपसर मतदारसंघात निवडणुकीपूर्वी वर्कऑर्डर झालेली सुमारे दहा कोटी रुपयांची विविध विकासकामे आचारसंहिता संपून दोन महिने होऊनही अद्याप सुरू झालेली नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी माजी आमदार भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. 

बाजार समितीचे माजी उपसभापती भूषण तुपे, विराज तुपे, संजय सातव, गणेश घुले, डॉ. कुमार कोद्रे, सुनील धुमाळ, संदीप लोणकर, पोपटराव वाडकर, अतुल तरवडे, अँड. प्रमोद सातव आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यालयाचे टाळे काढण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नकुल रणसिंग उपस्थित होते.

टिळेकर म्हणाले, "हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक होण्यापूर्वी मंजूर झालेली तसेच ज्या कामांची वर्कऑर्डर झालेली आहे. अशी रस्ते, सीमाभिंत, दशक्रिया विधी घाट, उद्यान, क्रीडांगण अशी विकास कामे प्रशासनाने जाणीव पूर्वक रखडवली आहेत. वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज आपण हे आंदोलन केले आहे. अधिकाऱ्यांनी ही विकास कामे येत्या दोन दिवसांत सुरू केली नाहीत, तर संबंधित अधिकारी वर्गाला रस्त्यावर फिरू देणार नाही.

विकासकामे करताना राजकारण करू नये. अधिकारी राजकारण करत असल्याचे जाणव आरोप माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे. सध्या राज्यात आलेले सरकार हे स्थगिती सरकार आहे.मात्र जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि मतदार संघातील विकास कामांसाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करू."

"वर्क ऑर्डर झालेली कोणतीही कामे बंद नाहीत. ऑरबीज स्कूल रस्त्याचे काम स्थानिक अडचणीमुळे बंद होते. तो प्रश्न मिटला असून येत्या चोवीस तासात हे काम चालू होईल. ज्या कामांची वर्क ऑर्डर झालेली नाही ती कामे मात्र सुरू करता येणार नाहीत''.

- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com