हवेलीचे माजी उपसभापती अजिंक्य घुले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य अजिंक्य घुले (वय ३३) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले.

मांजरी : हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य अजिंक्य घुले (वय ३३) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने हडपसर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सुरेश घुले हे त्यांचे वडील होत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजिंक्य घुले यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये मांजरी बुद्रुक गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती. लगेचच पुढील सव्वा वर्षे त्यांना उपसभापती पदी काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. 

आण्णासाहेब मगर कला व क्रिडा मंडळ आणि सुरेश अण्णा घुले मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी तरूणांचे मोठे संघटन केले होते. त्यांच्या सहकार्यातून घुले यांनी परिसरात सामाजिक काम सुरू ठेवले होते. दरवर्षी ते सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या येथील अनाथाश्रमातील मुलांसाठी त्यांनी वर्षभरापासून मोफत धान्य व भाजीपाला पुरवठा सुरू केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे मांजरी गावावर शोककळा पसरली आहे. तसेच जिल्हयातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Deputy Speaker of Haveli Ajinkya Ghule passes away