Former Director General of Police K. K. Kashyap passes away
sakal
पुणे - राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि पुण्याचे माजी पोलिस आयुक्त कमल कृष्ण कश्यप (वय ८१) यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी (ता. ७) दुपारी दीड वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.