
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन, ८५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Former Home Secretary Madhav Godbole died in pune)
हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगा राहूल, मुलगी मीरा आहेत.
डॉ. माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते.. यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. केली. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली.
तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं होतं. या आधी ते महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर जबाबदारी सांभाळली. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.
Web Title: Former Home Secretary Madhav Godbole Died In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..