madan bafna
sakal
वडगाव मावळ - महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व मावळ तालुक्यातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेते मदन हरकचंद बाफना (वय-८७ वर्षे) यांचे सोमवारी पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, पाच भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. १५) दुपारी चार वाजता वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.