Rupali Patil |"माझ्यासमोर दोन पर्याय..", रुपाली पाटील जाणार 'या' पक्षात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"माझ्यासमोर दोन पर्याय..", रुपाली पाटील जाणार 'या' पक्षात

"माझ्यासमोर दोन पर्याय..", रुपाली पाटील जाणार 'या' पक्षात

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) पक्षावर अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं दिसत होतं. त्यांनी सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स वरून मनसेच्या (Pune MNS) पदांची माहिती काढून टाकल्याचंही समोर आलं. यानंतर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा आणि सदस्यपदाचाही राजीनामा दिला. यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागून आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

हेही वाचा: रुपाली पाटील 'वेळ' साधणार? मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर...

"माझ्या समोर दोन पर्याय"

माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंच्या कार्यर्त्यांना मी काहीही वाईट बोलणार नाही. राज ठाकरेंना (Raj Thackeray) यासंदर्भात मी सर्व माहिती दिली आहे. मला कुठेतरी जायचं आहे, म्हणून मी मनसैनिकांना आणि राज ठाकरेंनी बदनाम करीन, असं होणार नाही. राज ठाकरे माझं दैवत आहे, आणि ते राहतील! माझ्यामुळे माझ्या पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना त्रास होणार असेल तर मी राजीनामा देत आहे. रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं, असंही त्या म्हणाल्या.

बदल झाला किंवा नाही झाला, तरी मी राज ठाकरेंना सर्व गोष्टी पोहोचवल्या आहेत. सगळ्या गोष्टी मी मीडियाला नाही सांगू शकत. मला मनसेत काय चुकतंय हे सांगण्याचा अधिकार नाही. ते मनसेचे नेते सांगतील. कालच्या राजीनाम्यानंतर माझे फोन बंद होते. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही.

माझ्यावर ही वेळ का आणली आणि का आली हे सर्व तुम्हालाही माहिती आहे, असं पाटील म्हणाल्या. माझ्यासमोर दोन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. मी शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी ज्या मुशीत वाढली आहे. जी माझी विचारसरणी आहे, त्याला अनुसरून पक्षप्रवेश करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात आहेत. उद्या पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Former Mns Leader Rupali Patil Likely To Enter In Ncp After Press Conference In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rupali patil thombare