Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गोगले अन् विटकर भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 :  वडगाव शेरी मतदार संघामधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किशोर विटकर आणि सुनिल (पप्पू) गोगले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशांमुळे मतदार संघातील भाजपची ताकद वाढली असून यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुखकर होणार असल्याची चर्चा आहे. या पक्ष प्रवेशांमुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. 

Vidhan Sabha 2019 :  वडगाव शेरी : वडगाव शेरी मतदार संघामधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किशोर विटकर आणि सुनिल (पप्पू) गोगले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशांमुळे मतदार संघातील भाजपची ताकद वाढली असून यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुखकर होणार असल्याची चर्चा आहे. या पक्ष प्रवेशांमुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. 

वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित गंगावने, राकेश मोहिते, शैलेश घाडगे, संजय शिर्के, प्रविण कणघरे, अश्विन कुमार गायकवाड, चेतन च्हाण, प्रशांतजी धिवार यांनी आज आमदार जगदिश मुळीक यांच्या उपस्थितीत 'भाजप'मध्ये प्रवेश केला.

यावेळी मुळीक म्हणाले की, ''वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद गेल्या पाच वर्षामध्ये वाढत चालली आहे. या मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामांमुळे इतर पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहे. या प्रवेशामुळे भाजपला बळ मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास सहा हजार कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघामध्ये 40 हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. 

मुळीक पुढे म्हणाले, ''वडगाव शेरीचा विकास हेच भाजपचे ध्येय आहे. वडगाव शेरी मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अनेक काम केली आहेत. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वडगावशेरी, चंदननगर, साईनाथनगर, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, येरवडा, लोहगाव आणि मांजरी या भागामध्ये प्रचाराच्या दरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे भाजपचा विजय निश्चित आहे. वडगावशेरी मतदार संघावर पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार आहे. 
.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former NCP corporator Gogale and Vitkar join BJP in Maharashtra Vidhan sabha 2019