jalinder kamthe and ajit pawar
sakal
कोंढवा - पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कामठे यांच्या प्रवेशामुळे पुरंदरसोबतच पुणे शहरातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ अधिक वाढेल, असे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.