
Pune News : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारावर पुण्यात उपचार
पुणे : क्रिकेट विश्वातील नावाजलेला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक(Ruby Hall Clinic) मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. संगकारा यांना ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता रुग्णालयात दाखल केले होते. डिहायड्रेशन आणि उच्च तापावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
रुबी हॉल रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. श्रीधर देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डिहायड्रेशन झाल्याचे आढळून आले होते आणि १०३ डिग्री ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले.
तसेच त्यांना इतर सहाय्यक उपचार दिले गेले. दरम्यान कुमार संगकारा हे विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले आहेत. त्यांना काल सामन्यापूर्वी संगकारा यांना डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा: Chitra Wagh Vs Chakankar : अशा रोज ५६ नोटिसा येतात; चाकणकरांवर चित्रा वाघांचा पलटवार