

फॉरच्युनर गाडीसाठी विवाहितेचा छळ
विवाहितेची विजापूर नाका पोलिसांत धाव; जळगावच्या सात जणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : सासरी नांदत असताना सासरच्यांनी फॉरच्युनर गाडी घ्यायला व सोन्याचे दागिने घेण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून छळ केल्याची फिर्याद विवाहितेने विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. जळगाव येथील सासरी सासरच्यांनी १४ मे ते ३ जुलै या काळात छळ केल्याची फिर्याद विवाहिता पल्लवी चेतन अमृतकर (रा. प्रल्हाद नगर, सोरेगाव) यांनी दिली आहे.
सोरेगावच्या पल्लवी यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील कजगाव- भंडगाव येथील चेतन अमृतकर याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही महिन्यातच सासरच्यांनी छळ सुरू केला. गाडी व दागिन्यासाठी पैसे आण म्हणून पती चेतन, सासू चित्रा, सासरा दिलीप, जाऊ गिता, दीर तुषार, मिलिंद व जाऊ मिनाक्षी (सर्वजण रा. केजगाव-भंडगाव, जि. जळगाव) यांनी छळ केला, असेही फिर्यादीत नमूद आहे. पती चेतन याने ‘मला तुझ्यासोबत संंबंध ठेवायचे नाहीत, तुझ्यापासून मला मूळबाळ नको आहे’ असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. पैशांसाठी छळ करुन त्यांनी घरातून हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार विशाल गायकवाड तपास करीत आहेत.
----------------
चौकट
लग्नात वॉशिंग मशीन न दिल्याने छळ
‘लग्नात मानपान केला नाही, तुझ्या माहेरच्यांनी वॉशिंग मशीन दिली नाही’ असे म्हणून सासरच्यांनी छळ केला. आता हरवलेले दोन तोळे सोने विकत घ्यायला माहेरून पैसे आण म्हणून पती विवेक जाधव, सासू सुषमा जाधव, नणंद निकिती व श्रृद्धा (सर्वजण रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. दोन, सोलापूर) यांनी छळ केला. त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत घरातून हाकलून दिल्याची फिर्याद विवाहिता अनुपमा जाधव (रा. प्रताप नगर, जुळे सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. ५ डिसेंबर २०२५ पासून त्यांनी छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.